अ‍ॅपशहर

न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसास मारहाण

पुण्यातील गजबजलेल्या कर्वे रोडवर न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. श्याम भादणे असे हल्लेखोराचे नाव असून त्यांनी वाहतूक पोलिस रवींद्र इंगळे यांना मारहाण केली आहे. विशेष म्हणजे ९ तास उलटून गेल्यानंतरही भदाणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Maharashtra Times 16 Aug 2017, 9:39 pm
मटा ऑनलाइन वृत्त। पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a traffic police beaten up on road by the husband of a judge in pune
न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसास मारहाण

पुण्यातील गजबजलेल्या कर्वे रोडवर न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. श्याम भादणे असे हल्लेखोराचे नाव असून त्यांनी वाहतूक पोलिस रवींद्र इंगळे यांना मारहाण केली आहे. विशेष म्हणजे ९ तास उलटून गेल्यानंतरही भदाणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

आज (बुधवारी) दुपारी साडेबाराच्या सुमाराला डेक्कन परिसरात नो एन्ट्री असतानाही श्याम भदाणे आपली दुचाकी घेऊन आले. तिथेच ड्यूटी करत असलेले वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र इंगळे यांनी वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे भदाणेंना अडवले. त्यानंतर भादणे आणि इंगळेंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे चिडलेल्या श्याम भदाणेंनी रवींद्र इंगळेंना मारहाण केली. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचे रेकॉर्डिंग झाले असून रेकॉर्डिंगमध्ये इंगळे यांना एक महिला देखील मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

ड्यूटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाला सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमक्ष मारहाण होऊन देखील या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. भदाणे यांची पत्नी न्यायाधीश असल्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहे का असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज