अ‍ॅपशहर

आगाखान पॅलेसकडे दुर्लक्षच

आगाखान पॅलेसमधील कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांच्या समाधीस्थळाच्या आवारातील भिंत पडून पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप भारतीय पुरातत्व विभागाकडून तेथे दुरुस्ती झालेली नाही. ऐतिहासिक आगाखान पॅलेसमधील हे दृश्य पाहून पर्यटनासाठी येणारे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Maharashtra Times 12 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aagakhan palace repair work is pending
आगाखान पॅलेसकडे दुर्लक्षच


आगाखान पॅलेसमधील कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांच्या समाधीस्थळाच्या आवारातील भिंत पडून पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप भारतीय पुरातत्व विभागाकडून तेथे दुरुस्ती झालेली नाही. ऐतिहासिक आगाखान पॅलेसमधील हे दृश्य पाहून पर्यटनासाठी येणारे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

दुष्काळग्रस्तांना रोजगार देण्यासाठी सुल्तान महंमद शाह, आगाखान (३ रे) यांनी १८८२ साली नगर रोडवर आगाखान पॅलेस बांधले. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२ च्या चळवळीत, या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई व कस्तुरबा गांधी यांचे येथेच निधन झाले. दोघांचीही येथे समाधी आहे. ऐतिहासिक आगाखान पॅलेसची देखभाल आणि दुरुस्ती भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे.

पंधरा दिवसांपूर्वी शहरात आलेल्या जोरदार पावसामुळे समाधी स्थळाकडे जाणाऱ्या आवारातील विटांची सीमा भिंत कोसळून पडली. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करूनही भिंतीची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे गांधीप्रेमी पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहे. याबाबत भारतीय पुरातत्व खात्याचे संवर्धन सहायक बी. जी. येलीकर म्हणाले, ‘वादळी पावसामुळे समाधीस्थळाच्या आवारातील सीमा भिंत कोसळली आहे. नवीन भिंत बांधण्यासाठी पुरातत्व विभागाला संपर्क साधून पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप परवानगी न मिळाल्याने काम सुरू झाले नाही.’


पर्यटकांची तक्रार

कस्तुरबा गांधी यांचे समाधी स्थळ असलेल्या आगाखान पॅलेस पाहण्यासाठी देश-विदेशातील दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. अशा ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने कटाक्षाने लक्ष देऊन देखभाल आणि दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पर्यटकांनी केली आहे. देशातून आणि विदेशातून पुण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जास्त असते. त्यापूर्वी हे काम होणे आवश्यक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज