अ‍ॅपशहर

पुण्यात भीषण अपघात! शिवशाही बसची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pune News: पुण्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात एक जण ठार झाला तर सात जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका कंटेनर आणि बसमध्ये हा अपघात झाला.

| Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2022, 8:05 am
पुणे: उरुळी देवाची हद्दीत हडपसर - सासवड रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका कंटेनर आणि शिवशाही बस यांमध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shivshahi bus accident


याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही एसटी बस जोरात होती. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

वाचा-मुसळधार पावसाने हाहाकार, नद्यांचं रौद्ररूप; मनमाडमध्ये नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं

ही बस पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसची धडक एवढ्या जोरात होती की बसचा पुढच्या भागचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि सात प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन गाडीतील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कारण कंटेनर ररस्त्यात पूर्ण आडवा झाला होता.

वाचा- पैसे घेऊनच राज्यात सत्तांतर, माझ्याकडे पुरावे आहेत, सिद्ध न झाल्यास...; नितीन देशमुखांचा नवा

या भागात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढू लागले असून दर दोन दिवसांनी मोठा अपघात होत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे जाणकार नागरिकांना सांगितले आहे. या अपघातात कंटेनरचे देखील मोठे नुकसान झाले असून कंटेनर चालक जखमी झाला आहे.

महत्वाचे लेख