अ‍ॅपशहर

एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा विद्यार्थी ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

Maharashtra Times 26 Jul 2016, 1:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident on express way 6 students died
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा विद्यार्थी ठार


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

मुंबईहून पुण्याला येत असलेली MH 14 EU 7038 क्रमांकाची सियाज कार भरधाव वेगात असतानाच चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानं जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार पलटी झाली. या कारमध्ये सहा जण होते. त्यापैकी पाच जण जागीच ठार झाले, तर एकाचा निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमधील तिघांची ओळख पटली आहे. आदित्य भांडारकर, यश शिराली आणि अभिषेक हे तिघं पुण्याचे रहिवासी आहेत. या अपघाताची चौकशी कामशेत पोलीस करत आहेत.



आदित्य भांडारकर



यश शिराली

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज