अ‍ॅपशहर

चूक सुधारण्यास भाग पाडू

'दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात कम्युनिस्ट पक्षासंदर्भात करण्यात आलेला उल्लेख पूर्णत: चुकीचा आहे.

Maharashtra Times 11 Apr 2018, 6:40 am
'दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात कम्युनिस्ट पक्षासंदर्भात करण्यात आलेला उल्लेख पूर्णत: चुकीचा आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षात पडलेली फूट देशांतर्गत धोरण काय असावे, यावरून पडली आहे. 'भाकप'ने कोणतेही परदेशी नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit


सरकारने बालभारतीच्या माध्यमातून अत्यंत खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे भविष्य घडविण्याची ताकद नाही, वर्तमानात राबविण्यासाठी कोणताही कार्यक्रम नाही, त्यांनी इतिहासाची मोडतोड करण्याचा एकमेव अजेंडा निश्चित केला आहे. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही; तसेच आम्ही या संदर्भात बालभारतीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही चूक सुधारण्यास भाग पाडू.'
- अजित अभ्यंकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज