अ‍ॅपशहर

ब्राह्मण महासंघात फूट; आनंद दवेंचा सवता सुभा

कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामध्ये आता उभी फूट पडली आहे. महासंघाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आनंद दवे यांनी दसऱ्याचा मुहूर्त साधून नवीन संघटनेची स्थापना केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2019, 2:20 pm
पुणे: कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामध्ये आता उभी फूट पडली आहे. महासंघाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आनंद दवे यांनी दसऱ्याचा मुहूर्त साधून नवीन संघटनेची स्थापना केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akhil bhartiya brahman mahasangh split over support to bjp candidate in kothrud
ब्राह्मण महासंघात फूट; आनंद दवेंचा सवता सुभा


विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

ब्राह्मण मतदारांची निर्णायक संख्या असलेल्या कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपने पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व पक्षाचा मराठा चेहरा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच महासंघामध्ये अस्वस्थता होती. कोथरूडमध्ये ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी महासंघाची मागणी होती. थेट मागणी करता येत नसल्यानं 'दूरचा नको, घरचा उमेदवार हवा' अशी पोस्टरबाजी मतदारसंघात करण्यात आली होती. मात्र, भाजपनं त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळं ब्राह्मण महासंघ नाराज होता. परशुराम सेवा संघ आणि ब्राह्मण महासंघानं इथं आपापले उमेदवार जाहीर केले होते.

परशुराम सेवा संघाच्या उमेदवारानं कालांतरानं माघार घेतली. कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात आली. त्या सक्रिय झाल्या. मात्र, ब्राह्मण महासंघाचा विरोध कायम होता. त्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम होता. अशातच दवे यांनी पाटील यांना परस्पर पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं संतापलेल्या महासंघाच्या राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी दवे यांची हकालपट्टी केली. या कारवाईमुळं दवे नाराज होते.

अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. 'ब्राह्मण महासंघ' असं या संघटनेचं नाव असून दवे हे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. 'ब्राह्मण समाजाचे सध्याचे नेतृत्व विकले गेले आहे. समाज बांधव त्यांच्यावर नाराज आहेत. नव्या संघटनेच्या माध्यमातून सर्व जातीपातींना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं काम केलं जाईल,' असं दवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज