अ‍ॅपशहर

सरकारचे नाक दाबणार- हजारे

'या वेळच्या नियोजित आंदोलनात कोणीही सेलिब्रिटी सोबत नसले, तरी तरुणांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे २३ मार्चला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या वेळी सरकारचे नाक दाबले जाईल, एवढी ताकद नक्कीच पुढे येईल,' असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Maharashtra Times 23 Jan 2018, 10:17 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna hazare again warns government
सरकारचे नाक दाबणार- हजारे


'या वेळच्या नियोजित आंदोलनात कोणीही सेलिब्रिटी सोबत नसले तरी तरुणांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे २३ मार्चला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या वेळी सरकारचे नाक दाबले जाईल, एवढी ताकद नक्कीच पुढे येईल,' असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे यांनी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन पुकारले आहे. राळेगणसिद्धी येथील कार्यालयातून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना हजारे म्हणाले, 'या आंदोलनाच्यावेळी अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासारखे कोणी नाही. अन्य कोणी सेलिब्रिटीही नाहीत. त्यामुळे आंदोलनाला गर्दी होणार का, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. मात्र, हे आंदोलन केवळ गर्दी जमविण्याचे नाही. नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही, हे लक्षात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन सरकारचे नाक दाबण्याचे आंदोलन असून तरुणांचा वाढता प्रतिसाद पाहाता या वेळच्या आंदोलनालाही यश येईल, अशी अपेक्षा आहे. लोकपाल कायदा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटायचे नाही, असे आरपारचे आंदोलन करण्यात येणार आहे.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या वीस आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता हजारे म्हणाले, 'या आमदारांवरील कारवाई दुर्दैवी आहे. मात्र, पक्षाची स्थापना करताना केजरीवाल यांनी आपण देशसेवेसाठी पक्ष स्थापन करीत असल्याचे सांगितले होते. बंगला, गाडी, सरकारी लाभ घेणार नाही, असे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. प्रत्यक्षात मात्र सध्या आम आदमी पक्षाच्या आमदारांचे मानधन इतरांपेक्षा जास्त आहे. त्यांनी पक्ष स्थापन केल्याने त्यांचा आंदोलनाशी काहीही संबंध राहिलेला नाही,' असेही हजारे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज