अ‍ॅपशहर

सायन्स शाखा सुरू होणार?

आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील आश्रमशाळेत अकरावीकरीता सायन्स शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांनी अपर आदिवासी विकास आयुक्तांना पाठविला आहे. त्यामुळे आदिवासी विकास आयुक्तालयाने तातडीने पावले उचलल्यास यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना सायन्सच्या शिक्षणासाठी घर सोडावे लागणार नाही.

Maharashtra Times 1 May 2016, 3:00 am
गोहे बुद्रुकमधील आश्रमशाळेतील अकरावीसाठी अपर आदिवासी विकास आयुक्तांकडे प्रस्ताव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashramshala gohe budruk
सायन्स शाखा सुरू होणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील आश्रमशाळेत अकरावीकरीता सायन्स शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांनी अपर आदिवासी विकास आयुक्तांना पाठविला आहे. त्यामुळे आदिवासी विकास आयुक्तालयाने तातडीने पावले उचलल्यास यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना सायन्सच्या शिक्षणासाठी घर सोडावे लागणार नाही.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील १३ आदिवासी आश्रमशाळांपैकी केवळ दोन आश्रमशाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज असून, तेथे केवळ आर्ट‍्स शाखेचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील १२० गावातील विद्यार्थ्यांना सायन्स व कॉमर्स शाखांचे शिक्षण घेता येत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील विद्यार्थीच तालुक्याच्या ठिकाणी किंवा पुण्यात शिक्षणासाठी येतात. हा प्रकार ‘मटा’ने प्रकाशझोतात आणला होता. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने आदिवासी विकास आयुक्तालयाकडे सायन्स शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत (घोडेगाव) पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत एकूण २३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी १३ आश्रमशाळा या पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक व जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आश्रमशाळेत ज्युनिअर कॉलेज कार्यान्वित आहे. आंबेगाव तालुक्याच्या गोहे बुद्रुक येथील शाळेतील विज्ञान शाखा शिक्षकांची बदली झाल्याने दोन वर्षांपूर्वी बंद झाली. गेल्या वर्षी पुन्हा तेथे विज्ञान शाखा सुरू करण्याची जाहिरात करून, प्रवेश प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. तेव्हा १८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र, कॉलेज सुरू होण्याच्या वेळेला विज्ञान शाखेला मान्यता न मिळाल्याने अभ्यासक्रम सुरू करता येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले होते. त्यामु‍ळे गेल्या वर्षी येथील विद्यार्थी सायन्स शाखेला मुकले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज