म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सोशल एक्टिविटी ग्रुपच्या वतीने 'एक पेड़-एक जिंदगी' उपक्रमांतर्गत निगडी येथे शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याचे लक्षात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. त्याचाच भाग म्हणून संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. निगडीतील ब्रह्माकुमारीजचे स्थानिक सेवा केंद्र आणि सायन्स पार्क यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. 'ब्रह्मकुमारी'चे पदाधिकारी पालिकेचे सह शहरअभियंता प्रवीण तुपे, शिक्षण अधिकारी नंदकुमार कासार, सुनील पोटे आदी उपस्थित होते. श्याम तावडे यांनी संयोजन केले.