अ‍ॅपशहर

'आता गाडी घसरायला लागली आहे, थांबतो'; अजित पवारांच्या भाषणाची पुन्हा चर्चा

ग्रामीण भागातील कार्यक्रमांमध्ये अजित पवारांचा विनोदी आणि मनमोकळेपणाने बोलण्याचा स्वभाव अनेकदा पहायला मिळतो. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चिमटे काढताना अजितदादांनी टोलेबाजी केली.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2022, 7:13 am
बारामती : अजितदादा आपल्या भाषणातून मिश्किल टोलेबाजी करत असतात. ग्रामीण भागातील कार्यक्रमांमध्ये त्यांचा विनोदी आणि मनमोकळेपणाने बोलण्याचा स्वभाव अनेकदा पहायला मिळतो. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चिमटे काढताना अजितदादांनी टोलेबाजी केली. मात्र, त्यातून त्यांनी सावरतं घेत आता गाडी घसरायला लागली आहे. मी थांबतो असं म्हणत आपल्या भाषणाची सांगता केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit pawar
ajit pawar


बारामती तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्तामामा भरणे राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. त्यांना आम्ही विनंती करत असतो की, आमच्या तालुक्याला पण निधी द्या. तुम्ही फक्त इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री नाही आहात.'

'राष्ट्रवादीने भुयार यांना फोडले, राजकारणात टोळीयुद्ध', राजू शेट्टींचा घणाघात
'बांधकाम विभागाच्या चाव्या तुमच्या हातात आहेत. परंतु, त्यांना कुठं माहिती की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी जर तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा.' असं म्हणत आता गाडी घसरायला लागली आहे आता थांबतो, अशी सारवारवी करत अजित पवारांनी सावरून घेतलं. दरम्यान, त्यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज