म. टा. प्रतिनिधी, पुणे
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करणाऱ्या पतीसह सासरे आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून, त्यानुसार वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किरण साईनाथ गाडे, साईनाथ गाडे आणि सुरज गाडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
किरण याचा विवाह डिसेंबर महिन्यात झाला होता. तक्रारदार महिलेचा कौटुंबिक कारणावरून आरोपींनी सतत छळ केला आणि विवाहितेस मारहाणदेखील केली; तसेच, किरण याचे लग्नापूर्वी प्रेमसंबध होते, ही माहिती लपवून विवाहितेबरोबर त्याचे लग्न करण्यात आल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. वानवडी पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.