अ‍ॅपशहर

‘भाऊसाहेब रंगारी’ची नोटीस

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या वादावरून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली आहे. मंडळाकडून मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांसह महापौर मुक्ता टिळक, पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:13 am
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षावरून वाद चिघळण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhausaheb rangari trust send notice to mayor
‘भाऊसाहेब रंगारी’ची नोटीस


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या वादावरून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली आहे. मंडळाकडून मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांसह महापौर मुक्ता टिळक, पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
ब्रिटिशविरोधी लढ्यासाठी भाऊसाहेब रंगारी यांनी पुढाकार घेऊन १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असा दावा मंडळाने केला आहे. याच उपक्रमाची दखल घेऊन १८९४मध्ये लोकमान्य टिळक यांनी विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे, सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२५वे वर्ष नसून, १२६ वे वर्ष आहे. तरीही पुणे महापालिका यंदा गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष म्हणून साजरे करण्याच्या तयारीत आहे. त्याला विरोध करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने महापालिकेच्या विरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेसह ट्रस्टने महापौर मुक्ता टिळक, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेतील सर्व विरोधी पक्ष नेते व गटनेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनाही नोटीस बजावली आहे.
राज्य सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्यसैनिक चरित्र कोश, खंड क्र. ३ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे जयंतराव टिळक आ​णि केसरीचे संपादक ज. स. करंदीकर यांनी १९५२मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात ‘गणेशोत्सवाची साठ वर्षे’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तरीही पालिका प्रशासन जाणूनबुजून हा प्रकार घडवत असल्याचा आरोप, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पालिकेने त्वरीत आपली चूक कबूल करून २०१६-२०१७ वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष होते, असे जाहीर करावे अशी मागणी ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज