अ‍ॅपशहर

'तू शाळेत आली नाहीस तर मला करमत नाही': शिक्षकाचे सहावीतील मुलीशी अश्लील चाळे; आरोपीला अटक

Pune News Today : भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह जाऊन आरोपी दादासाहेब खरात याच्याविरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 2:34 pm
पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दादासाहेब अंकुश खरात असं नराधम शिक्षकाचं नाव आहे. दादासाहेब खरात याच्याविरोधात तीन ते चार महिन्यांपूर्वी देखील अशीच तक्रार पालकांनी केली होती. पंरतु शाळेने कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती. केवळ माफीनामा लिहून घेतला, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यानंतर आता इयत्ता सहावीत शिकणाऱ्या पीडित मुलीच्या पालकांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhigwan police
भिगवण पोलीस


मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीला एकटीला वर्गात ठेवून तिला तू शाळेत रोज येत जा, तू नाही आलीस तर मला करमत नाही आणि हे बघ मी तुझे नाव माझ्या हातावर लिहलं आहे, असं म्हणत या नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीने या नराधमाच्या तावडीतून सुटका करत पळ काढला. तसंच घरी धाव घेत झालेल्या प्रकारची माहिती आई-वडिलांना दिली.

महिलेची राहत्या घरात गळा आवळून निर्घृण हत्या; मुलीने प्रियकराच्या मदतीने केले कृत्य?

सबंधित प्रकार पालकांना समजताच पालकांनी शाळेत जात शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह जाऊन आरोपीविरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीबाबत अत्यंत गंभीर प्रकार घडल्यानंतर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी सदर प्रकारची माहिती वरिष्ठांना दिली असून त्यांच्या सुचनेने पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाचे लेख