अ‍ॅपशहर

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीला पाठीमागून दुचाकीने जोरात धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 2 Aug 2021, 5:09 pm
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीला पाठीमागून दुचाकीने जोरात धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. येरवडा जेल रस्त्यावर रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हरमीत सुरेंद्रपाल सिंग (वय ३०, रा. संतनगर, लोहगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र कोळेकर (रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात एका खासगी बँकेत हरमीत सिंग नोकरीला होता. रविवारी पहाटे मित्रांना भेटून जेल रस्त्यामार्गे पल्सर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने घरी निघाला होता. नागपूर चाळसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीला दुचाकी घासल्यावर तोल जाऊन समोरील मोटारीला पाठीमागून जोरात धडक दिली.

अपघातात सिंग गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक भगवान गुरव पुढील तपास करीत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज