अ‍ॅपशहर

भाजप कार्यकर्त्याचा कोयत्यानं वार करून खून

मावळ तालुक्यातील सांगवडे गावच्या महिला सरपंच दिपाली लिमण यांचे पती नवनाथ लिमण यांचा कोयत्यानं वार करून निर्घृण खून करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. गावातील देवळाच्या समोरच शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपी फरार आहेत.

Maharashtra Times 23 Apr 2017, 2:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp leader stabbed to death by five six people
भाजप कार्यकर्त्याचा कोयत्यानं वार करून खून

मावळ तालुक्यातील सांगवडे गावच्या महिला सरपंच दिपाली लिमण यांचे पती नवनाथ लिमण यांचा कोयत्यानं वार करून निर्घृण खून करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. गावातील देवळाच्या समोरच शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपी फरार आहेत.

गावात रात्री कीर्तन चालू असताना दोन गटात वाद झाला. त्या वादातून झालेल्या हल्ल्यात नवनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ळेगाव-दाभाडे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी योगेश गजानन राक्षे याला ताब्यात घेतले असून इतर पाच आरोपी फरार आहेत. सांगवडे गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज