अ‍ॅपशहर

पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराच्या खूनानंतर १७व्या दिवशी गूढ उलगडलं, आधी कॉफी पाजली नंतर...

Pune Murder News Today : पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका वास्तूशास्त्र सल्लागाराची हत्या केल्यानंतर १७ व्या दिवशी पोलिसांना मोठी माहिती हाती लागली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2022, 10:22 am
पुणे : बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवित अली होती. १७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. खूनानंतर आरोपींनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune murder news today


निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नर्‍हे, आंबेगाव), साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक केली आहे. याबाबत रुपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. निलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते.

Naseem Khan: काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात, कारचं बोनेट चक्काचूर
आरोपी निलेश यांच्या परिचयाचे होते. दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले होते. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र, मृतदेह आढळून आला नाही. आरोपींना अटक केल्यापासून पोलिसांकडून निरा नदीत मृतदेहाचा शोध घेतला जात होता.

पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, भोईराज आपत्ती संघ, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघाच्या मदतीने अखेर सतराव्या दिवशी वरघडे यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, विवेक सिसाळ, हवालदार शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज