बीड : जिल्ह्यातील परळी रेल्वे स्टेशनवर पूर्णा-हैदराबाद रेल्वे सोमवारी सकाळी इंजिन बदलण्यास थांबली असता, त्यात प्रवास करणाऱ्या एका मुलाने तोंडात सुतळी बॉम्ब वाजवला. त्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजामुळे स्टेशन परिसरात धावपळ उडाली. तोंडात बॉम्ब फुटल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. सय्यद अक्रम असे त्याचे नाव असून तो पाथरी (ता. परभणी) येथील रहिवासी आहे. तो पूर्णा ते हैदराबाद या रेल्वेने प्रवास करीत होता. सकाळी साडेदहाला गाडी परळी स्टेशनवर आली असता ही घटना घडली. त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
तोंडात सुतळी बॉम्ब फोडला, रेल्वे स्थानकात पळापळ
जिल्ह्यातील परळी रेल्वे स्टेशनवर पूर्णा-हैदराबाद रेल्वे सोमवारी सकाळी इंजिन बदलण्यास थांबली असता, त्यात प्रवास करणाऱ्या एका मुलाने तोंडात सुतळी बॉम्ब वाजवला. त्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजामुळे स्टेशन परिसरात धावपळ उडाली.
Maharashtra Times 24 Dec 2019, 7:25 am