अ‍ॅपशहर

लग्नादिवशी प्रियकर पळाला; प्रियकराच्या मामानं नवरीला विषारी पेढा भरवला अन् मग...

चार वर्षापासून एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाचे रूपांतर लग्न बंधनात होईल, असे स्वप्न प्रेयसीने पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लग्न करण्याचेही ठरले. मात्र ऐनवेळी प्रियकरच लग्न मंडपातून पळून गेला. हे कमी म्हणून की काय, मुलाच्या मामाने मुलीला विषारी पेढा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या राजवडी येथे घडला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2022, 4:03 pm
इंदापूर: चार वर्षापासून एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाचे रूपांतर लग्न बंधनात होईल, असे स्वप्न प्रेयसीने पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लग्न करण्याचेही ठरले. मात्र ऐनवेळी प्रियकरच लग्न मंडपातून पळून गेला. हे कमी म्हणून की काय, मुलाच्या मामाने मुलीला विषारी पेढा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या राजवडी येथे घडला. याप्रकरणी प्रियकरासह त्याचा मामा व मावसभाऊ अशा चौघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल मधुकर कदम, संतोष सुखदेव गलांडे, अकुंश सुखदेव गलांडे, स्वप्नील दत्तात्रय शिंगटे (सर्व रा. गलांडवाडी नं.१,ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम relatives gave poisonus pedha to bride to be
प्रातिनिधीक छायाचित्र


इंदापूर तालुक्यातील २४ वर्षीय तरुणी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचा कोर्स करत आहे. तिच्या महाविद्यालया जवळच असणाऱ्या राजवडी गावातील एका दूध डेअरीत काम करत असणाऱ्या हर्षल कदम याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध आहेत. तरुणीचे वडील, हर्षलचे मामा संतोष सुखदेव गलांडे, अकुंश सुखदेव गलांडे यांनी ३१ जुलैला इंदापूरातील सिद्धेश्वर मंदिरात त्या दोघांचे लग्न करण्याचे ठरवण्यात आले.दोन्ही मामांनी ५ लाख रुपये हुंडा मागितला. हे सर्व ठरले असताना ऐन लग्नाच्या दिवशी हर्षल घरातून निघून गेला. त्यामुळे हे लग्न आता होऊ शकत नाही, असे त्याच्या मामांनी तरुणीच्या वडिलांना सांगितले. दुसऱ्या दिवशी राजवडी गावात एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू असे सांगून ते निघून गेले.
आता १ लाख घ्या, ५ नंतर देतो! विम्याच्या ३५ लाखांसाठी पतीनं पत्नीची सुपारी दिली अन् मग...
दुसऱ्या दिवशी तरुणीचे आईवडील व प्रियकराचे मामा व मावस भाऊ हे राजवडी येथे एकत्र बसून चर्चा करत असताना मुलाचा मामा अकुंश गलांडे हा त्या तरुणीजवळ आला. तिला बाजूला घेऊन 'झालेला प्रकार हा खूप वाईट होता. आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू' असे म्हणाले. हा देवाचा पेढा आहे. हा पेढा खाल्ल्यानंतर सर्व काही चांगले होईल असे म्हणून सर्वांसमक्ष गलांडे यांनी तरुणीला पेढा खायला लावला आणि ते सर्व घरी आले.
क्रौर्याची परिसीमा! नराधमानं पत्नी अन् लेकीचं मुंडकं छाटलं; बायकोचं डोकं सासरी ठेऊन आला
तरुणीचे आई, वडील शेतात गेल्यानंतर तिला चक्कर येवून उलट्या होवू लागल्या. त्या रात्री नऊ वाजता तिला उपचारासाठी इंदापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ४ ऑगस्टपर्यंत तिला शुद्ध नव्हती. तिने विषारी औषध घेतले होते का अशी शंका तिच्या आईला आली. मात्र तिने नकार दिला. हर्षलच्या मामाने पेढा खायला दिल्यानंतर आपल्याला त्रास झाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने वरील चौघा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील अधिक तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज