अ‍ॅपशहर

छेडणाऱ्या तरुणाच्या आवळल्या मुसक्या

खराडी आयटी पार्क येथील कंपनीत काम करणाऱ्या महिलेने त्रास देणाऱ्या सहकाऱ्याची माहिती ‘बडीकॉप’ला दिली. तक्रारीची तत्काळ दखल घेऊन चंदननगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला त्रास देणाऱ्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

Maharashtra Times 23 Apr 2017, 4:59 am
बडीकॉप’च्या मदतीने अभियंता तरुणीची तक्रार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम buddycop arrests youth in it company
छेडणाऱ्या तरुणाच्या आवळल्या मुसक्या


म. टा. प्रतिनिधी, पुणे

खराडी आयटी पार्क येथील कंपनीत काम करणाऱ्या महिलेने त्रास देणाऱ्या सहकाऱ्याची माहिती ‘बडीकॉप’ला दिली. तक्रारीची तत्काळ दखल घेऊन चंदननगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला त्रास देणाऱ्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
किशोर रामदास औटी (वय ३०, रा. विलासदीप सोसायटी, चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या बाबत वीस वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हिंजवडीतील सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणीच्या खुनानंतर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आयटी आणि अन्य क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेतसाठी ‘बडीकॉप’ योजना सुरु केली. चंदननगर, हडपसर, हिंजवडी आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत योजनेला सुरुवात झाली आहे.
संबंधित पोलिस ठाण्यात आयटी कंपन्यांतील महिला आणि पोलिस अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. एका बडीकॉप ग्रुपमध्ये पन्नास महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिलांना मदत हवी असल्यास पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याऐवजी बडीकॉपला सांगितल्यानंतर घटनास्थळी जाऊन महिलांना मदत करण्यात येते. याच पद्धतीने बडीकॉपकडे तक्रार केल्यानंतर चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर आणि उपनिरीक्षक संदीप साळुंके यांनी एका महिलेला मदत केली.
खराडी येथील कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीने कंपनीतील सहकारी सतत त्रास देत असल्याची तक्रार चंदननगर बडीकॉपच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली. त्याची उपनिरीक्षक साळुंखे यांच्या पथकाने दखल घेतली. तत्काळ तक्रारदार मुलीस फोन करुन विचापूस केली. त्यानंतर औटीला ताब्यात घेतले. काही दिवसांपासून औटी तरुणीला त्रास देत होता. त्याबाबत तिने कंपनीकडे तक्रार केली होती. त्यावेळी औटीला समज देऊन सोडण्यात आले. मात्र, औटीने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि अपशब्द वापरले. त्यानंतर तरुणीने या प्रकरणाची माहिती ‘बडीकॉप’ला दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज