अ‍ॅपशहर

करोना चाचणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिल्यास ही कारवाई होणार

करोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर फसवणूक केल्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2020, 10:17 pm
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: करोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर फसवणूक केल्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी दिला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आढावा बैठक पालिकेत झाली. आयुक्त हर्डीकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus in pune


राज्यात करोनाचे आकडे चिंता वाढवणारे; आज १८४ दगावले

करोनासदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत आहेत. रूग्ण आढळल्यास त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार, तपासण्या, चाचण्या अथवा मार्गदर्शनपर सूचना करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेत नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, काही नागरिक करोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी खोटा अथवा चुकीचा पत्ता, नाव, मोबाईल क्रमांक देत असल्याने प्रभावीपणे उपाययोजना राबविण्यात बाधा निर्माण होत आहेत. अशांवर कारवाई करण्याचा इशारा हर्डीकर यांनी दिला.

राज्यात आता ई-पासशिवाय प्रवास करता येणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सामूहिक संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित असण्याच्या पार्श्वभूमीवर सूचना देण्यात आल्या. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांमध्ये व्यापारी तसेच कामगार, घंटागाडी आणि सफाई कर्मचारी यांच्या तपासण्या आवश्यक आहेत. गावठाण भागातही प्रभावी उपाययोजना राबवून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना हर्डीकर यांनी दिल्या. औद्योगिक उद्योगांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन हर्डीकर यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज