बालदिन साजरा
पटवर्धन बाग येथील स्पोर्ट्स नर्सरी या मैदानावर बालदिनाचे निमित्त साधून, बालगीतांच्या समूहगायनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी ज्येष्ठ गायिका सीना गरसोळे यांनी विविध बालगीते गायली. शीतल गरसोळे यांनी साथ केली. कार्यक्रमाचे संयोजन अनुराधा येडके यांनी केले. परिसरातील सर्व बालकांनी पालकांसह कार्यक्रमाचा आनंद लुटला.