अ‍ॅपशहर

कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. रविवारी (२५ मार्च) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माण येथे घडली.

Maharashtra Times 26 Mar 2018, 9:56 am
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sahil-ansari


भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. रविवारी (२५ मार्च) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माण येथे घडली. साहिल भुट्टो अन्सारी (रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी) असे कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा आपल्या घराच्या बाहेर रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खेळत होता. त्या वेळी अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांनी साहिलवर हल्ला चढविला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे पालक त्याला सोडवण्यासाठी आले. तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला. साहिलला उपचारांसाठी सुरुवातीला माण येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, तेथे योग्य उपचार न मिळाल्याचे सांगत त्याच्या पालकांनी त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज