म. टा. प्रतिनिधी, पुणे
थंडीमुळे आठवडाभरापासून पुण्यात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत असताना सोमवारी ढगाळ हवामानाने नागरिकांची निराशा केली. दिवसभरात कमाल तापमानात वाढ झाल्याने शहरात उकाडा जाणवत होता. संध्याकाळनंतर थंडीचा जोर ओसरला होता. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र, शनिवारपासून थंडीचा जोर ओसरला आणि सोमवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. संध्याकाळीही हवेत गारवा जाणवला नाही. हवामान विभागाच्या नोंदीनुसार पुण्यात दिवसभरात ३२.२ अंश सेल्सिअस कमाल आणि १४. ७ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट नोंदविण्यात आली. मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यातील नीचांकी तापमान ७.८ अंश सेल्सिअस नागपूरमध्ये नोंदविण्यात आले. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, तापमानातही किंचित वाढ होणार आहे. येत्या २५ ते २८ डिसेंबर दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.