अ‍ॅपशहर

‘सीएम’चे वेलकम; अजितदादांना ‘गुडबाय`

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निवडणूक निकाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक कारभाराचे शहरवासीयांनी `वेलकम` केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती सत्तेला `गुडबाय` केले आहे. देश, राज्य आणि महापालिकेतही भाजपची लाट असल्याचे सिद्ध करीत स्थानिक नेतृत्त्वावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविण्यात आला आहे.

Maharashtra Times 24 Feb 2017, 9:18 am
Sunil. Landage@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm devendra fadanvis welcome goodbye ajit pawar
‘सीएम’चे वेलकम; अजितदादांना ‘गुडबाय`


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निवडणूक निकाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक कारभाराचे शहरवासीयांनी `वेलकम` केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती सत्तेला `गुडबाय` केले आहे. देश, राज्य आणि महापालिकेतही भाजपची लाट असल्याचे सिद्ध करीत स्थानिक नेतृत्त्वावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविण्यात आला आहे.

शहराचा इतिहास लक्षात घेता १९८६ पासून आजतागायत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच बारामतीकरांची हुकुमत संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासक कारभारासाठी सत्तेच्या पायघड्या घालण्यात आल्या असून, विकासाचा दावा करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कारभाराला हद्दपार करण्यात आले आहे. यापुढील काळात आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे ही राम-लक्ष्मणाची जोडी कारभार पाहणार असून, त्यांना खासदार अमर साबळे आणि आझम पानसरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे साबळे वगळता कारभाराची सूत्रे हाती घेणारी ही सर्व मंडळी अजितदादांच्याच तालमीत तयार झाली आहेत. आता त्यांच्याच मदतीने मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना धोबीपछाड केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. सर्वप्रथम आमदार महेश लांडगे यांना गोटात सामावून घेऊन मुख्यमंत्र्यांनी भाजपची ताकद वाढविली. त्यापाठोपाठ २५ हून अधिक नगरसेवक आणि काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाचे संख्याबळ तीनहून थेट ७८ पर्यंत पोहचले. शिवाय सत्तेचे दरवाजेही खुले झाले. या माध्यमातून पालिकेचा पारदर्शक कारभार पाहण्यासाठी शहरवासीय उत्सुक आहेत. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, आरक्षणांचा विकास आणि रेडझोन या प्रश्नांबाबत प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, शी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पारदर्शक जाहीरनाम्यात `आपले पिंपरी-चिंचवड-स्मार्ट पिंपरी-चिंचवड` या घोषणेसह पालिकेतील हजारो कोटी रुपयांची अखंडित भ्रष्टाचार मालिका उध्वस्त करण्याचा निश्चय केला होता. बहुमताने कमळ फुलविण्याची साद घातली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज