अ‍ॅपशहर

जळगाव-विद्यार्थ्यास मारणाऱ्या शिक्षकावरुध्द तक्रार (सुधारीत)

विद्यार्थ्यास मार; पालक संतप्त म टा...

Maharashtra Times 25 Sep 2018, 4:00 am

विद्यार्थ्यास मार; पालक संतप्त

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

घरचा अभ्यास केला नाही म्हणून तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास पट्टीने मारहाण केल्याने विद्यार्थ्याच्या पालकांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. एका शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्ग शिक्षकाने दिलेला अभ्यास करून आणला नाही म्हणून लाकडी पट्टीने उजव्या पायावर तर चापटांनी गालावर मारले. या घटनेत संबंधित शिक्षकाने मारहाण केल्याने त्यांच्या पाय आणि गालाला व्रण आले होते. विद्यार्थी शाळेतून बाहेर आल्यानंतर त्याला मारहाण केल्याचे लक्षात आले. त्यामुळे पालकांनी थेट जिल्हा पेठ पोलिसात धाव घेतली होती. पोलिस ठाण्यात शिक्षकाला बोलविण्यात आले. मात्र, काहीवेळ चर्चा केल्यानंतर तक्रार न दाखल होता वादावर पडदा पडला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज