अ‍ॅपशहर

पद्मशाली समाजाच्या जातपंचायतीवर गुन्हा

पद्मशाली समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरपंचासह पाच जणांवर ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण’ (जात पंचायत विरोधी) कायद्यानुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 22 Sep 2017, 4:46 am
जातीतून बहिष्कृत करण्याची दिली धमकी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम complaint against padmshali sociey peoples
पद्मशाली समाजाच्या जातपंचायतीवर गुन्हा


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पद्मशाली समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरपंचासह पाच जणांवर ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण’ (जात पंचायत विरोधी) कायद्यानुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्मशाली समाज पंच कमिटीचे सरपंच सोमनाथ कैंची (रा. गुरूवार पेठ), विश्‍वस्त महादेव काडगी (रा. धनकवडी), अध्यक्ष दिलीप जाना (रा. कोंढवा), उपाध्यक्ष विनायक साका (रा. महात्मा फुले पेठ) आणि सदस्य विनोद जालगी (रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंज पेठ येथे पद्मशाली समाज पंच कमिटीची ‘पद्मशाली भवन’ ही मालमत्ता आहे. या मालमत्तेमध्ये फिर्यादीच्या आजोबांच्या काळापासून २५० चौरस फुटाचे सुरेंद्र जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. या दुकानाची भाडेपावती वर्षानुवर्षे फिर्यादीच्या आजोबांच्या नावावर आहे. ती फिर्यादी यांच्या नावाने करण्यासाठी त्यांचे वडील आणि आजोबांनी अनेकवेळा पंच कमिटीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, सरपंच कैंची आणि जाना यांनी फिर्यादीच्या नावावर भाडेपावती करण्यासाठी पाच लाख रुपये आणि दरमहा १५ हजार रुपये भाडे देण्याची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या पंच कमिटीच्या विश्‍वस्तांनी त्यांना शिवीगाळ केली. पैसे न देण्याचे परिणाम कुटूंबीयांना भोगावे लागतील अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धमकीची तक्रार ​दिली होती. मात्र तडजोडीनंतर ती त्यांनी मागे घेतली. याचा राग राग मनात धरून पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलवून पोलिसांत तक्रार दिल्याने आमची बदनामी झाली आहे. याबाबत माफी मागा नाही तर, तुम्हाला समाजातून बाहेर काढण्याची धमकी दिली.
असा मेसेज पद्मशाली समाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही फिरविण्यात आला. पैसे न दिल्याने पंचांनी बदनामी सुरू केल्याने अखेर फिर्यादीने तक्रार दाखला केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज