पुणे : शहरात गुरुवारी महापालिकेच्या ६१ केंद्रांवर कोव्हिशील्ड लस उपलब्ध असणार आहेत. या लशीचा पहिला डोस १८ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार असून, त्यामध्ये ७० टक्के डोस हे ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर ३० टक्के डोस हे लसीकरण केंद्रांवर नोंदणी केल्यानंतर देण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिन लस ही १५ केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस हा २६ मे पूर्वी घेतला असून त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. उपलब्ध लशींपैकी ५० टक्के डोस हे ऑनलाइन अपॉईटंमेटद्वारे, तर उर्वरित ५० टक्के डोस हे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर देण्यात येणार आहेत. कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस देण्यात येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व केंद्रावर लशींचे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध असणार आहेत. ऑनलाइन बुकिंगसाठी सकाळी आठ वाजता बुकिंग करता येणार आहे.