अ‍ॅपशहर

पुणे: वृद्धेसह बालिकेला रुग्णालयांनी जागेअभावी प्रवेश नाकारला

एका वृद्धेसह एका वर्षाच्या बालिकेला रुग्णालयांनी जागेअभावी उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या वृद्धेचा चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2020, 7:51 am
पुणे: शहरातील एका साठ वर्षांच्या महिलेसह एका वर्षाच्या बालिकेला खासगी रुग्णालयासह नायडू रुग्णालयानेही उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अखेर त्या दोघींना ससून रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने चाचणीसाठी पाठवले. ज्येष्ठ महिलेचा अहवाल प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आहे. तर बालिकेचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune hospital


याशिवाय गेल्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून नाकारण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यासंदर्भात रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.

ससून रुग्णालयात एका साठ वर्षांच्या महिलेला ससून रुग्णालयात जागा नसल्याने धनकवडीतील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, तिकडे जागा नसल्याचे कारण देत रास्ता पेठेतील खासगी रुग्णालयासह नायडू रुग्णालयातून पुन्हा ससून रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. त्यामुळे ही ज्येष्ठ महिला काल सकाळी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आली. तिच्यात करोनासदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले. त्यांचा स्वॅब घेण्यात आला. वृद्ध महिलेचा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून, पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर बालिकेचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील नव्या अकरा मजली इमारतीत उपचार सुरू आहेत. या महिलेला सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, आणखी एका वर्षाच्या लहान मुलीला श्वसनाचा त्रास होत होता. या मुलीला ससूनमध्ये जागा नसल्याने धकवडीतील खासगी रुग्णालयासह नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्या दोन्ही रुग्णालयांनी नाकारले. त्यामुळे पुन्हा या रुग्णाला ससून रुग्णालयात माघारी यावे लागल्याची वस्तुस्थिती समोर आली. या मुलीला ऑक्सिजनची गरज असल्याने धनकवडीतील रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथेही जागा नव्हती. त्यामुळे तिला दाखल करून घेण्यात आले नाही. अखेर या मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राज्यात ५५२ नवे करोनाग्रस्त; १२ मृत्यू, रुग्णसंख्या ४२००वर

नगर : ATMमध्येच प्रसुती; मुलीला दिला जन्म

संगमेश्वरला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज