अ‍ॅपशहर

पुण्यात अवघ्या काही तासांत पाच जणांचा मृत्यू

मुंबईनंतर करोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव झालेल्या पुण्यात आज अवघ्या काही तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू, ससून व नोबेल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2020, 4:02 pm
पुणे: महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पुण्यात मागच्या काही तासांत करोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना बळींची संख्या १३ वर गेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pune


करोना Live: मुंबईत एकाएकी ४४ रुग्ण वाढले

पुणे शहरात रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. काल मध्यरात्रीनंतर ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नायडू, ससून व हडपसर येथील नोबेल रुग्णालयात बहुतांश करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यातील पाच जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ससून रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिला आहे. अन्य दोघे हडपसर आणि कोंढाव्यातील राहणारे होते. यापैकी एकाचे वय ५४ तर दुसऱ्याचे वय ७१ वर्षे होते.

वाचा: शिवसेनेनं मांडला पेट्रोल, डिझेलच्या नफ्याचा हिशेब

नायडू रुग्णालयात एका ४४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला अनियंत्रित मधुमेहाचा आजार होता. त्यातच त्याचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. ४ एप्रिलपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज अखेर त्यानं प्राण सोडला.

करोना: बुलडाणा ठरतोय हॉटस्पॉट; संख्या १२ वर

हडपसर येथील नोबेल रुग्णालयात एका ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ते सय्यदनगर येथील राहणारे होते. त्यांना मधुमेहाचा आजार होता.

वाचा: 'मुंबई केंद्राला अडीच लाख कोटी देते; २५% परत द्या'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज