अ‍ॅपशहर

'मराठी चित्रपट, टीव्ही मालिकांचे चित्रीकरण थांबवा'

राज्यात विविध ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. राज्य सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, चित्रपट महामंडळानं चित्रीकरण थांबवण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 11:19 pm

सरकारी कार्यालये बंद नाहीत; ट्रेन, बस सुरूच राहणार: CM

पुणे: सरकारने आदेश दिल्यानंतरही काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, मालिका, लघुपट, वेब सीरीज आणि माहितीपटांचे चित्रीकरण थांबवावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने निर्मात्यांना केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi film


करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली आहे. चित्रपटगृह व नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत बंद करण्याची सूचना केली आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेले चित्रीकरण थांबवण्याची सूचना केली आहे. मात्र राज्यात अजूनही चित्रीकरण सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर चित्रपट महामंडळाने चित्रीकरण थांबवण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, वाहिन्यांचे प्रमुख, निर्माते यांची बैठक घेण्यात आली. चित्रपट, मालिका, लघुपट, वेब सीरीज आणि माहितीपट यांचे चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. सर्वांनी मिळून चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.


पिंपरी चिंचवड: बाजारपेठा २ दिवस राहणार बंद

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपणही प्रतिसाद दिला पाहिजे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रकल्प सुरू आहेत. अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. चित्रपटांसह मालिका, लघुपट, वेब सीरीज यांचे सुरू असलेले चित्रीकरण थांबविण्यास सांगितले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीनेही चित्रीकरण थांबविले आहे. कलाकारांची व कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक नुकसान होणार असले तरी, सर्व प्रकल्प तात्काळ थांबविण्याचे आवाहन करण्यात आले असून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

अमरावतीत फुकट वाटल्या कोंबड्या व अंडी

करोना: राज्यातील रुग्णांची संख्या ४१ वर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज