अ‍ॅपशहर

पुण्यात भाजप आमदाराच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राम सातपुते यांचे रविवारी पुणे येथे थाटात लग्न पार पडले. या विवाह सोहळ्यात सर्व शासकीय नियमांचा पुरता फज्जा उडविण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2020, 1:09 pm
भारतासह संपूर्ण जगात करोना विषाणूने थैमान घातलं असल्याने याचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीचे समारंभ टाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसार लग्नासारख्या समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळून केवळ २०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राम सातपुते यांचे रविवारी पुणे येथे थाटात लग्न पार पडले. या विवाह सोहळ्यात सर्व शासकीय नियमांचा पुरता फज्जा उडविण्यात आला. पुणे येथील शुभारंभ लॉन्स येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ram satpute wedding.
bhp mla ram satpute wedding



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक खासदार, आमदारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. यातील काही नेत्यांनी या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले. यातून लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता, हे स्पष्ट दिसतं. कोरोना विषाणूवरील लस अद्याप भारतीयांना उपलब्ध झालेली नाही. भारतातून करोना हद्दपार झालेला नसताना विद्यमान आमदाराच्या या शाही लग्नात हजेरी लावलेल्या नेत्यांपासून सर्वसामान्यांनी तोंडाला मास्क लावला नसल्याचं दिसून येत होतं. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य जनतेला वारंवार नियमांचे पालन करण्याचं आवाहन करत असताना लोकप्रतिनिधीच्या लग्नातच हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं पाहून सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


शासनाच्या नियमानुसार लग्नासारख्या समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळून केवळ २०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येते. परंतु आमदार राम सातपुते यांनी यांच्या लग्नासाठी हजारो लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडालेली दिसत होती. सर्वसामान्य लोकांनी नियमांचे पालन न केल्यास पोलीस त्यांना दंड आकारते. नियम केवळ सर्वसामान्यांनाच लागू होतात का? लोकप्रतिनिधींच्या समारंभाकडे पोलीस दुर्लक्ष होतय का, अस सवाल सोशल मीडियावरून विचारण्यात येतोय.

वाचाः

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज