अ‍ॅपशहर

नदीपात्रात आढळले धडावेगळे शिर

शिवाजी पुलाजवळ मुठा नदीपात्रात एका अनोळखी पुरूषाचे धडावेगळे शीर पाण्यात तरंगताना मंगळवारी दुपारी आढळून आले. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरात शरीराचा उर्वरित भाग शोधण्यासाठी पाहणी केली.

Maharashtra Times 25 May 2016, 1:34 am
पुणे : शिवाजी पुलाजवळ मुठा नदीपात्रात एका अनोळखी पुरूषाचे धडावेगळे शीर पाण्यात तरंगताना मंगळवारी दुपारी आढळून आले. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरात शरीराचा उर्वरित भाग शोधण्यासाठी पाहणी केली. पण, तो सापडला नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime
नदीपात्रात आढळले धडावेगळे शिर


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुठा नदीपात्रात शिवाजी पुलाजवळ ४० ते ४५ वर्षांच्या एका पुरूषाचे शिर पाण्यावर तरंगत असल्याचे एका नागरिकाला दिसले. या व्यक्तीने घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रातील गवताला शीर अडकल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक हिरामण शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलातील जवान, पोलिसांनी नदीपात्र तसेच सभोवतालच्या परिसर पिंजून काढला. तसेच, सापडलेल्या शीराच्या धडाचा शोध घेतला मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नदी पात्रातील शीर पाण्याबाहेर काढून पुढील तपासणीसाठी रूग्णालयात पाठवून दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज