अ‍ॅपशहर

निराशेतून मुलानेच केला वडिलांचा खून

काटेवाडी खून प्रकरण; पोलिसांकडून चार दिवसांत तपास

Maharashtra Times 18 May 2017, 3:00 am
बारामती : निराशेतून व गैरसमजुतीने आर्थिक मदत नाकारल्याने मुलानेच वडिलांचा खून केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. काटेवाडी (बारामती) येथील दिगंबर काटे यांच्या खुनाचा अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news pune
निराशेतून मुलानेच केला वडिलांचा खून


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर काटे हे मुलगा अभय यास नेहमी दुय्यम वागणूक देत होते. निराशेतून व गैरसमजुतीने आर्थिक मदत नाकारल्याने मुलानेच वडिलांचा खून केला. मुलाने वडिलांचा काटेवाडी कन्हेरी रस्त्यावरील निरा डाव्या कालव्याच्या भराव्यावर धारदार सुऱ्याने गळा चिरुन खून केला आणि मृतदेह नीरा डाव्या कालव्यात टाकून दिला. खून वाटू नये; तसेच तो अपघात वाटावा यासाठी त्याने दिगंबर काटे यांच्याकडे असलेली मोटारसायकलदेखील नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी अभयला अटक केली आहे. खून करण्यासाठी वापरलेला सुरा पोलिसांनी जप्त केला. त्याच्यावर कलम ३०२प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या गुन्हे शोध पथकातील शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, संदीप मोकाशी, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, अनिल काळे आदींच्या पथकाने खुनाचे कोडे उलगडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज