अ‍ॅपशहर

प्रदर्शनात ग्राहकांचे ‘विंडो शॉपिंग’

बाजारात जाणवणाऱ्या सुट्ट्या पैशांच्या कमतरतेचा फटका बालगंधर्व रंगमंदिर परिसरात भरविण्यात आलेल्या पुनवडी जत्रेला पहिल्याच दिवशी बसला. महिलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आवडत असल्या तरी, सुट्टे पैसे नसल्याने ग्राहक खरेदीला मुरड घालून केवळ ‘विंडो शॉपिंग’चा आनंद घेत आहेत. त्यामुळे बचत गटाच्या महिलांचा मात्र हिरमोड होत आहे.

Maharashtra Times 10 Dec 2016, 4:19 am
बचत गटांनाही बसतोय सुट्ट्या पैशांचा फटका; उद्योजिकांचा हिरमोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम customers enjouying with window shopping
प्रदर्शनात ग्राहकांचे ‘विंडो शॉपिंग’


म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाजारात जाणवणाऱ्या सुट्ट्या पैशांच्या कमतरतेचा फटका बालगंधर्व रंगमंदिर परिसरात भरविण्यात आलेल्या पुनवडी जत्रेला पहिल्याच दिवशी बसला. महिलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आवडत असल्या तरी, सुट्टे पैसे नसल्याने ग्राहक खरेदीला मुरड घालून केवळ ‘विंडो शॉपिंग’चा आनंद घेत आहेत. त्यामुळे बचत गटाच्या महिलांचा मात्र हिरमोड होत आहे.
मानसी महिला उन्नती केंद्र आणि पुणे महापालिकेच्या नागर वस्ती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुनवडी जत्रा भरविण्यात आली आहे. यामध्ये शंभरहून अधिक बचत गट सहभागी झाले आहे. येथे पापड, लोणची, इमिटेशन ज्वेलरी, शोभिवंत वस्तू आणि खाद्य पदार्थांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, सुट्ट्या पैशांच्या टंचाईचा परिणाम स्टॉलवर होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी काही महिलांनी पेटीएमची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्या व्यक्त करीत आहेत.
‘प्रदर्शनाला येणाऱ्या महिला थेट दोन हजार रुपयांची नोट घेऊन येत आहेत. वस्तूची किंमत अवघी शंभर ते दोनशे रुपयेच असताना त्यांना सुट्टे देणे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना मोजके पैसे द्या अन्यथा जास्त खरेदी करण्याची विनंती करीत आहोत,’ असे सावित्री बचत गटाच्या संजीवनी रायकर यांनी सांगितले. ग्राहकांच्या सोयीसाठी दोन ते तीन स्टॉल मिळून एक स्वाइप मशिन बसविण्याचा रास्त पर्याय आहे. मात्र, या मशिनचाही तुटवडा सध्या जाणवत आहे. त्यामुळे आम्हाला रोखच व्यवहार करावा लागत आहे. केवळ सुट्टे पैसे नाहीत, म्हणून महिला खरेदी न करताच निघून जात आहेत, असे अनसुया महिला बचत गटाच्या सुलोचना वाईकर यांनी सांगितले.
स्वामी ओम बचत गटाच्या विद्या मुरूडकर यांसह काही बचत गटांनी त्यांच्या स्टॉलवर पेटीएमची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पेटीएमधारक ग्राहक खरेदीसाठी येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद् घाटन करण्यात आले. या वेळी महापौर प्रशांत, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, मानसी महिला उन्नती केंद्राच्या दीप्ती चवधरी उपस्थित होत्या. येत्या १२ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते ७ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज