अ‍ॅपशहर

‘मनसे’ची हडपसरला महागाईविरोधी दहीहंडी

‘भाजप-शिवसेना सरकारपुढे सत्तेचा थाट आणि जनते पुढे वाढले महागाईचे ताट’, ‘भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सरकारविरोधात हडपसर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध नोंदवला.

Maharashtra Times 17 Aug 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dahihandi programme by mns
‘मनसे’ची हडपसरला महागाईविरोधी दहीहंडी


‘भाजप-शिवसेना सरकारपुढे सत्तेचा थाट आणि जनते पुढे वाढले महागाईचे ताट’, ‘भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सरकारविरोधात हडपसर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध नोंदवला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडपसर मतदार संघातर्फे गाडीतळ चौकात महागाईची दहीहंडी उभारण्यात आली होती. हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दहीहंडी फोडली.

‘मध्यमवर्गीय नागरिकांना रोजच्या जेवणात लागणाऱ्या कांदा, टोमॅटोचे भाव वाढले आहेत. हे अच्छे दिन नसून महागाईचे दिन आहेत’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. दहीहंडीला कांदे, बटाटे, टोमॅटो, गाजर, भोपळा, तसेच पेट्रोल-डिझेलच्या बाटल्या बांधण्यात आल्या होत्या. या वेळी हडपसर परिसरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईनाथ बाबर म्हणाले, ‘सरकारला सामान्य नागरिकांचे काही घेणे देणे नाही. सरकार फक्त स्वतःचा व आपल्या व्यावसायिकांचा विचार करत आहे. आज महागाई एवढी वाढली की नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत कोणी ही बोलायला तयार नाही.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज