कोंढवा खुर्द परिसरातील इनामदार हॉस्पिटलसमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिल रफिक शेख (वय ४३, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अपघातानंतर फरारी झालेल्या अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस तपास करीत आहेत.
कारच्या धडकेने मृत्यू
कोंढवा खुर्द परिसरातील इनामदार हॉस्पिटलसमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2020, 4:00 am