अ‍ॅपशहर

Kabaddi: खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील एका विद्यार्थ्याला कबड्डी खेळताना चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली असून हा विद्यार्थी येथील नवोदय विद्यालयात शिकत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2018, 7:29 pm
पुणे: शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील एका विद्यार्थ्याला कबड्डी खेळताना चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली असून हा विद्यार्थी येथील नवोदय विद्यालयात शिकत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम death of boy while playing a kabbadi in pune
Kabaddi: खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू


गौरव अमोल वेताळ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो इयत्ता आठवीत शिकतो. तो चांगला कबड्डीपटू होता. त्याला कोणताही आजार नव्हता. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. त्यामुळे त्याला शिक्षकांनी तात्काळ शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी दवाखान्यात दाखल केले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, शाळा प्रशासनाने या प्रकरणावर अधिक बोलण्यास नकार दिला. तर गौरवच्या मृत्यूची बातमी खूप उशिरा कळविण्यात आल्याचा आरोप करतानाच या प्रकरणाची जबाबदारी घेण्यास शाळा प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज