अ‍ॅपशहर

'डेक्कन क्वीन' तासभर रोखून धरली

पुण्याहून मुंबईला निघणारी 'डेक्कन क्वीन' एक्स्प्रेस संतप्त प्रवाशांनी सोमवारी सकाळी पुणे स्थानकावर तब्बल तासभर रोखून धरली.

Maharashtra Times 10 Jul 2017, 9:40 am
मटा ऑनलाइन वृत्त | पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deccan queen super fast express travelers protest against railway administration
'डेक्कन क्वीन' तासभर रोखून धरली


पुण्याहून मुंबईला निघणारी 'डेक्कन क्वीन' एक्स्प्रेस संतप्त प्रवाशांनी सोमवारी सकाळी पुणे स्थानकावर तब्बल तासभर रोखून धरली.

'डेक्कन क्वीन एक्स्प्रेस'ने दररोज चाकरमानी मोठ्या संख्येने कामासाठी मुंबईकडे येत असतात. या एक्स्प्रेस गाडीचे हजारो पासधारक प्रवासी देखील आहेत. नेहमी फलाट क्रमांक १ वरून निघणारी डेक्कन क्वीन गेल्या सहा महिन्यांपासून फलाट क्रमांक ५ वरून निघत आहे. प्रवाशांना याचा त्रास होत असल्याने त्याबाबतची वारंवार तक्रार देखील रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येत होती. मात्र, याची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने आज प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी 'डेक्कन क्वीन' रोखून धरत आपला निषेध व्यक्त केला. यामुळे दररोज सकाळी ७.१५ वाजता निघणारी डेक्कन क्वीन आज ८ च्या सुमारास रवाना झाली.

रेल्वे प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांपासूनच्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने या गाडीच्या नियमीत प्रवाशांनी आज सकाळी ठरवून हे आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज