अ‍ॅपशहर

आत्मनिर्भर भारतासाठी वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पुण्यात डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारतासाठी वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2022, 7:17 pm
पुणे : डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी २० रोजी संपन्न झाला. यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, 'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. आपल्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर भारत आता अवलंबून राहू इच्छित नाही. त्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'ची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. स्वदेशीची पहिली हाक याच पुण्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी दिली होती. विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगात नव्या संकल्पना आणण्यावर भर द्यावा सरकार त्यांच्या पाठीशी आहे', असे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pune News
आत्मनिर्भर भारतासाठी वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह


या समारंभात ज्येष्ठ उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया आणि सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांचा राजनाथसिंह यांच्या हस्ते डीपीयूच्या मानद पदवी, डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट)ने गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी जेव्हा रसगुल्ल्यासाठी मनोज प्रभाकरच्या कानशिलात लगावली होती;वादाचं जुनं

यावेळी राजनाथसिंह म्हणाले की, करोना आपत्तीनंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राबद्दलचा जगभरातील आदर वाढला आहे. आरोग्य, निरोगीपणा याला आपल्या संस्कृतीत प्राधान्य देण्यात आले आहे. शरीरासोबतच मनस्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे. सुख-दुःखात, लाभ-तोट्यात, विजय-पराजयात स्थितप्रज्ञ राहणे खूप महत्वाचे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, भारतात धर्माचा ऱ्हास होतो आहे. याचा अर्थ लोकांनी सतत देवळात जाऊन आरत्या कराव्यात किंवा मशिदीत जाऊन बसावे असे त्यांना अभिप्रेत नव्हते. समाज व राष्ट्राप्रती दायित्व आणि नैतिकता हा धर्म गांधीजींना अपेक्षित होता. न्याय हे इंग्लंडचे, उदारमतवाद हे फ्रान्सचे तर धर्म हे भारताचे राष्ट्र वैशिष्ट्य असल्याचे विवेकानंद सांगत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी राष्ट्राचा विचार केला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

RR vs CSK Live Score IPL 2022 : चेन्नईचा शेवट पराभवानेच, राजस्थानने साकारला दमदार विजय
वैद्यकीय क्षेत्रातले उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जगाची दारं खुली आहेत. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा मात्र देशाचा विसर पडू देऊ नका. तुमच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांना तुम्ही कदाचित ओळखतही नाही अशा देशातल्या शेतकऱ्यांपासून मजूरापर्यंतच्या लहानसहान प्रत्येक घटकाचा वाटा आहे. त्यांच्या त्यागाची, बलिदानाची किंमत पैसे देऊन चुकवता येणार नाही. त्यामुळे या पुढच्या आयुष्यात लोकांशी स्नेहाने वागा, त्यांचा आदर करा, त्यांची सेवा करा. आपण चांगले डॉक्टर तर बनालच पण त्यापेक्षा अधिक चांगले माणूस व्हा, असे आवाहन देखील राजनाथसिंह यांनी यावेळी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज