अ‍ॅपशहर

विनयभंगप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

माझ्या दवाखान्यात कामाला ये, त्या डॉक्टरपेक्षा दुप्पट पगार तुला देतो, तसेच सर्व सुविधा पुरवतो, असे बोलून हात पकडणाऱ्या डेंटिस्टविरोधात २४ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Maharashtra Times 11 Sep 2017, 3:00 am
हडपसर : माझ्या दवाखान्यात कामाला ये, त्या डॉक्टरपेक्षा दुप्पट पगार तुला देतो, तसेच सर्व सुविधा पुरवतो, असे बोलून हात पकडणाऱ्या डेंटिस्टविरोधात २४ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून संबंधित डेंटिस्टविरोधात विनयभंग, तसेच दमगाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dentist booked for molestation in hadapsar
विनयभंगप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा


डॉ. ओंकार प्रकाश हरिदास (वय ३२, रा. हांडेवाडी रोड, सातवनगर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी हडपसर येथील एका डॉक्टरकडे तीन वर्षांपासून सहायक म्हणून नोकरी करीत होती. डॉ. ओंकार याने या तरुणीला मोबाइलवरून हडपसर येथील आस्था डेंटल क्लिनिक येथे बोलावून घेतले. ‘मी तुला दुप्पट पगार देऊन सर्व सुविधा पुरवेल,’ असे म्हणून संबंधित डॉक्टरने तरुणीचा विनयभंग केला, तसेच मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज