म. टा. प्रतिनिधी, पुणे
उत्साह, आनंद आणि मनाला समृद्ध करणाऱ्या दिवाळी सणाची रंगत सांगीतिक कार्यक्रमांनी आणखी वाढते. अशा अनेक कार्यक्रमांची मेजवानी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' ने वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. 'नवे सूर नवे तराणे' अशा मैफल २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' या कार्यक्रमांचा सांस्कृतिक प्रायोजक आहे.
स्वरपरिक्रमा आयोजित 'स्वर दीपावली' या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सायंमैफलीने दिवाळीचे स्वागत होणार आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या मैफलीत पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि तेजस-राजस उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन होणार आहे. स्वरपरिक्रमातर्फे २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४५ वाजता होणाऱ्या 'स्वर दीपावली' कार्यक्रमात पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन), अतुल कांबळे (तबला), दीपक भानुसे (बासरी), प्रतीक राजकुमार (गिटार-शास्त्रीय वादन) यांचा कलाविष्कार अनुभवता येईल. दोन्ही दिवशी या मैफल गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहेत.
२७ ऑक्टोबर रोजीच पहाटे ६.३० वाजता मोंटे रोजा येथे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाट रंगणार आहे. पं. शौनक अभिषेकी (गायन), शाकीर खाँ (सतार), अभिषेक बोरकर (सरोद) यांची संगीत मैफल रंगणार आहे. याच दिवशी मैत्र आणि अनंत थिएटरतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे पहाटे ६.१५ वाजता योगिता गोडबोले, संदीप उबाळे, राधिका अत्रे यांची मैफल ऐकता येईल. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे २९ ऑक्टोबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पहाटे ६.३० वाजता होणाऱ्या 'इनामदारी' या विशेष कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार आणि सहकारी यांची अनोखी खुसखुशीत मैफल अनुभवता येईल.
२६ ऑक्टोबर
स्वर दीपावली
पं. शौनक अभिषेकी (गायन), तेजस व राजस उपाध्ये (व्हायोलिन)
गणेश कला क्रीडा मंच : सायं. ६
२७ ऑक्टोबर
स्वर दीपावली
पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन), अतुल कांबळे (तबला), दीपक भानुसे (बासरी), प्रतीक राजकुमार (गिटार-शास्त्रीय वादन)
गणेश कला क्रीडा मंच : पहाटे ५.४५
२७ ऑक्टोबर
दिवाळी पहाट
पं. शौनक अभिषेकी (गायन), शाकीर खाँ (सतार), अभिषेक बोरकर (सरोद)
मोंटे रोजा, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता : पहाटे ६.३० (सर्वांना मुक्त प्रवेश)
२७ ऑक्टोबर
दिवाळी पहाट (गायन मैफल)
योगिता गोडबोले, संदीप उबाळे, राधिका अत्रे
टिळक स्मारक मंदिर : पहाटे ६.१५
२९ ऑक्टोबर
दिवाळी पहाट
इनामदारी : कौशल इनामदार आणि सहकारी
बालगंधर्व रंगमंदिर : पहाटे ६.३०
सर्व कार्यक्रमांच्या मर्यादित प्रवेशिका 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (एफसी रोड) कार्यालयात आहेत. तसेच, कार्यक्रमाच्या ठिकाणीही सर्व मैफलच्या प्रवेशिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 'कल्चर क्लब'च्या सदस्यांना एका प्रवेशिकेवर एक प्रवेशिका मोफत मिळेल. नवीन सदस्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ९६५७०३२६०९, ०२०-६७४७२४७६ (स. ११ ते सायं. ५) https://mtcultureclub.com/pune/
दिवाळीसाठी खास सवलत
या बातमीचे कात्रण घेऊन येणाऱ्यास कोणत्याही एका कार्यक्रमाचा एक पास मोफत दिला जाईल. तसेच, दिवाळीनिमित्त वाचकांना २९९ रुपयांचे 'मटा कल्चर क्लब'चे सदस्यत्त्व १९९ रुपयास उपलब्ध. ही ऑफर मर्यादित.