अ‍ॅपशहर

‘इतिहास समजला नाही, तर अस्तित्वच धोक्यात’

‘पुढच्या ५० वर्षांत भारतीयांना त्यांच्या प्राचीन आणि वैभवशाली इतिहासाचे महत्त्व समजले नाही, तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच संपेल आणि पाश्चिमात्य देशांच्या वसाहतीचे स्थान एवढीच भारताची ओळख राहील,’ अशी भीती उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांनी व्यक्त केली.

Maharashtra Times 22 Aug 2016, 10:43 am
पुणेः ‘पुढच्या ५० वर्षांत भारतीयांना त्यांच्या प्राचीन आणि वैभवशाली इतिहासाचे महत्त्व समजले नाही, तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच संपेल आणि पाश्चिमात्य देशांच्या वसाहतीचे स्थान एवढीच भारताची ओळख राहील,’ अशी भीती उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांनी व्यक्त केली. हेरिटेज इंडिया या नियतकालिकाच्या ‘संग्राह्य संच’ प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम do not understand history but the very existence threatened
‘इतिहास समजला नाही, तर अस्तित्वच धोक्यात’


डॉ. फिरोदिया म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीची ओळख जगालाच नाही तर भारतीयांनाही करून देणे आवश्यक झाले आहे. हे झाले नाही, तर पुढच्या पिढीला हा वैभवशाली वारसा समजणारच नाही. त्यामुळे वारसा सांगणे ही आता आपली जबाबदारी ठरते.’ या वेळी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांचे ‘हडप्पा संस्कृती’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाचा वारसा प्रगत होता. हडप्पा संस्कृतीच्या शहरांमध्ये सुनियोजित शहरे, सांडपाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय काटेकोरपणे केली होती. बांधकामाच्या क्षेत्रात वापरली जाणारी ‘इंग्लिश बॉण्ड’ ही पद्धत खरे तर हडप्पा संस्कृतीत सर्वप्रथम वापरली गेली. पण, सारे जग युरोपला हे श्रेय देते,’ असेही ते म्हणाले. या वेळी संस्थेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अ. प्र. जामखेडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्याणी सरदेसाई यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज