अ‍ॅपशहर

शतायुषी डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे नाबाद १०१

​आज १४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ संस्कृत पंडित, महाभारत, ऋग्वेद, निरुक्त; तसंच पारशी धर्मग्रंथ अवेस्ता यांचे अभ्यासक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे वयाची १०१ वर्ष पूर्ण करत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 14 Feb 2019, 11:31 am
पुणे:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम madhukar-mehendale


आज १४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ संस्कृत पंडित, महाभारत, ऋग्वेद, निरुक्त; तसंच पारशी धर्मग्रंथ अवेस्ता यांचे अभ्यासक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे वयाची १०१ वर्ष पूर्ण करत आहेत.
डॉ. मेहेंदळे यांचा अभ्यास या वयातही सुरूच आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही त्यांना बरंच काम करायचं आहे. प्रचंड इच्छाशक्ती, ज्ञानसंपादनाची प्रचंड महत्त्वकांक्षा या जोरावर त्यांची ही ज्ञानसाधना सुरू आहे.

डॉ. मेहेंदळे यांच्या कार्यावर त्यांचे चिरंजीव (निवृत्त) कर्नल प्रदीप, डॉ. अशोक यांनी धनंजय वसंत मेहेंदळे (मेहेंदळे मोशन पिक्चर्स, पुणे) यांच्या सहयोगाने एक माहितीपट तयार केला आहे.
या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट संकलन असे तीन पुरस्कारही मिळाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज