अ‍ॅपशहर

डॉ. महेश तुळपुळे यांचे निधन

म टा प्रतिनिधी, पुणेन्याय वैद्यकीय शाखेत हातखंडा असणारे फिजिशियन डॉ महेश तुळपुळे यांचे रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले ते ६८ वर्षांचे होते...

Maharashtra Times 23 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

न्याय वैद्यकीय शाखेत हातखंडा असणारे फिजिशियन डॉ. महेश तुळपुळे यांचे रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. स्वतःची मते निर्भिडपणे मांडणारे वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. निष्णात फिजिशियन म्हणून त्यांनी पुण्यात ३७ वर्षे प्रॅक्टिस केली. ते पूना हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस, एमडीच्या (मेडिसीन) विद्यार्थ्यांना शिकवत होते. उत्तम शिक्षक असलेले डॉ. तुळपुळे पूना हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर आणि रुबी हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करीत होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) व्यवस्थापन समितीचे ते सदस्य होते. काही वर्षापासून त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच शनिवारी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली. डॉ. तुळपुळे हे ज्येष्ठ सर्जन डॉ. के. सी. घारपुरे यांचे भाच्चे होत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज