अ‍ॅपशहर

​ नेत्रदानाबाबत समाजात अजूनही गैरसमज

‘अवयवदान, नेत्रदानासारख्या विषयांबाबत समाजात जवळपास ९० टक्के जणांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते. नवीन पिढी शिक्षित असूनही अवयवदान केल्यास पुनर्जन्म मिळत नाही, किंवा नेत्रदान केल्यास भुताचा जन्म मिळतो अशा खुळ्या कल्पना अस्तित्त्वात आहेत. व्हॉटसअॅप आणि फेसबुकमध्ये रमणा-या नव्या पिढीपर्यंत हे विषय चित्रपटांच्या माध्यमातून पोहोचवल्यास त्यांना ते सहज कळू शकतील’ असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 23 Dec 2017, 4:08 am
डॉ. तात्याराव लहाने यांची खंत; चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr tatayasaheb lahane spoke on eye donation
​ नेत्रदानाबाबत समाजात अजूनही गैरसमज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अवयवदान, नेत्रदानासारख्या विषयांबाबत समाजात जवळपास ९० टक्के जणांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते. नवीन पिढी शिक्षित असूनही अवयवदान केल्यास पुनर्जन्म मिळत नाही, किंवा नेत्रदान केल्यास भुताचा जन्म मिळतो अशा खुळ्या कल्पना अस्तित्त्वात आहेत. व्हॉटसअॅप आणि फेसबुकमध्ये रमणा-या नव्या पिढीपर्यंत हे विषय चित्रपटांच्या माध्यमातून पोहोचवल्यास त्यांना ते सहज कळू शकतील’ असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.
पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आयोजित सातव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. लहाने आणि यूएसके फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. उषा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लहाने बोलत तो बोलत होते. पी. एम. शहा फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी, 'नॅशनल फिल्म अर्काईव्हज् ऑफ इंडिया'चे (एनएफएआय) संचालक प्रकाश मगदूम, अतुल शहा, दिग्दर्शक मंगेश जोशी, वैद्यकीय व्यावसायिक डॉ. लीना बोरूडे, समीक्षक सुनील भोंडगे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. लहाने म्हणाले, की ‘देशात २२ लाख व्यक्तींना डोळ्यांची गरज असून, त्यात २ लाख लहान मुलांचा समावेश आहे. ८० लाख मृत व्यक्तींमागे केवळ ५० हजार व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुस-या व्यक्तीच्या शरीरात जिवंत राहणा-या अवयवाचा एक प्रकारे पुनर्जन्मच होतो. मला स्वतःला बावीस वर्षांपूर्वी माझ्या आईने मूत्रपिंड दान केल्यामुळे पुनर्जन्म मिळाला. परंतु, समाजात अवयवदान, नेत्रदानाविषयी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.’
‘उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला असून इतर गोष्टींपेक्षा तब्येतीवर गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे,’ असे उषा काकडे यांनी सांगितले. आरोग्याशी निगडित असलेले विविध विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या लघुपट व माहितीपटांचा हा महोत्सव 'एनएफएआय'मध्ये सुरू असून, महोत्सवात एकूण तीस लघुचित्रपटांचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज