निधन वार्ता
विलास दहिवाल
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
निगडी-यमुनानगर येथील विलास जगन्नाथ दहिवाल (वय ६९) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि नातवंडे असा परिवार आहे. 'बीएसएनएल'मधून कार्यकारी अभियंतापदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांनी शक्तिपात योगाची दीक्षा घेतली होती. पत्रकार अर्चना दहिवाल यांचे ते सासरे होते.
..
शिवाजी वाखारे
फुगेवाडी येथील नामवंत मल्ल शिवाजी महादेव वाखारे (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. वारकरी संप्रदायाची त्यांना विशेष आवड होती. फुगेवाडीतील श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रा. मनोज वाखारे यांचे ते वडील होत.