अ‍ॅपशहर

शिंदे गटाची ठाकरे गटाला टस्सल, ज्या चौकात हल्ला झाला तिथेच उदय सामंतांचा जाहीर सत्कार

Uday Samant Latest News : आगामी निवडणुकांच्या आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमिवर वातावरण सध्या तापलं असताना आता कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा होणार आहे अशी माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2022, 4:21 pm
पुणे : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे हल्ला झाला होता. आदित्य ठाकरे यांची दि. २ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर कात्रज चौकामध्ये उदय सामंत यांची गाडी पास होत असताना जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची काच फोडण्यात आली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यामध्ये सभा आयोजकांसह ५ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्याच कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा होणार आहे अशी माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uday samant news marathi


तानाजी सावंत, किरण साली, नाना भानगिरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, वार आणि वेळ अजून निश्चित झाली नाही. पण उदय सामंत यांची चार ठिकाणी सभा होणार असून कात्रज इथेही सभा होणार असल्याची माहिती आहे.

कोकणात तुफानी पाऊस सुरू, 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २ ऑगस्ट रोजी पुणे दौरा होता. सगळे कार्यक्रम आटपून ते हडपसरवरून आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज इथे निवासस्थानी जाणार होते. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार उदय सामंत होते. मात्र, त्यांनी गुगल मॅप लावण्याने त्यांचा रस्ता चुकला आणि थेट ते आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहचले.

तिथे जमलेल्या जमावाने त्यांना पाहताच गद्दार-गद्दार घोषणा देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रसंगात त्यांच्या गाडीची काच फुटली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला असून ६ आरोपींना अटक केली आहे. मात्र, ज्या ठिकाणी उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला, त्याच कात्रज चौकात सामंत यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती नाना भानगिरे यांनी दिली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज