अ‍ॅपशहर

उसनवारी फेडताना माननीयांची दमछाक

स्वतःच्या नावापुढे ‘माननीय’ आणि ‘नगरसेवक’ हे बिरुद मिरविण्यासाठी यंदा झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक हवश्या-नवश्यांनी नशीब आजमावले होते. यात काहींच्या पदरी निराशा; तर काही जणांचा निवडणुकीत विजय झाला. पण यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक नगरसेवकांनी उसनवारी, कर्ज, मालमत्ता विक्रीतून पैसे उभे केले होते. आता या पैशांची परतफेड करताना त्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. कर्ज मिळविण्यासाठी आता हेच माननीय विविध बँकांचे उंबरे झिजवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रोहित आठवले | Maharashtra Times 26 Dec 2017, 3:00 am
पिंपरी : स्वतःच्या नावापुढे ‘माननीय’ आणि ‘नगरसेवक’ हे बिरुद मिरविण्यासाठी यंदा झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक हवश्या-नवश्यांनी नशीब आजमावले होते. यात काहींच्या पदरी निराशा; तर काही जणांचा निवडणुकीत विजय झाला. पण यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक नगरसेवकांनी उसनवारी, कर्ज, मालमत्ता विक्रीतून पैसे उभे केले होते. आता या पैशांची परतफेड करताना त्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. कर्ज मिळविण्यासाठी आता हेच माननीय विविध बँकांचे उंबरे झिजवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम election
उसनवारी फेडताना माननीयांची दमछाक

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. १९८२ ला नगरपालिकेतून महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वी अनेक दिग्गज कार्यकर्त्यांना नागरिकांनी नगरसदस्य म्हणून निवडून दिले आहे. यातील बहुतांश जणांनी शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
मात्र, मागील काही वर्षांपासून नगरसेवक बननण्यासाठी शहरातील अनेक हवश्या-नवश्यांनी नशीब आजमावण्यास सुरुवात केली होती. त्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे नगरसदस्य म्हणून महापालिकेत दाखल झाले आहेत. मात्र, उसने अवसान आणून यातील अनेकांनी निवडणूक लढविल्याचे आता उघड होऊ लागले आहे.
राज्यातील एकंदरीत निवडणुकांपैकी पिंपरी-चिंचवडच्या निवडणुका या हायप्रोफाइल समजल्या जातात. अनेक वॉर्डांमध्ये करोडपती उमेदवार रिंगणात होते; तर त्यांना टक्कर देण्यासाठी ‘आम्ही ही कमी नाही’, हे दाखविण्याच्या नादात अनेकांनी प्रतिष्ठेचा फुगवटा निर्माण केला होता. त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे.
प्रतिष्ठा मिळविण्याच्या नादात अनेकांनी घरदार-शेती, मालमत्ता पडत्या भावात विकून निवडणुकीसाठी पैसा उभा केला होता. तर अनेकांनी बाजारातून उसनवारी करून तर काहींनी बँकांचे कर्ज घेत नशीब आजमावले होते. यापैकी बऱ्याच जणांना सहा-सात महिन्यांमध्येच या पैशांची परतफेड करताना दमछाक होऊ लागली आहे; तर काही जण बाजारातून उचललेले पैसे फेडण्यासाठी शहरातील प्रमुख स्थानिक बँकांमध्ये जाऊन कर्ज मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भोसरी विधानसभा मतदार संघातील चार, चिंचवड मतदार संघातील दोन तर पिंपरी विधानसभा मतदार संघातील तिघांचा समावेश असल्याचे समजते. या नऊ जणांपैकी चार जण स्वतः किंवा त्यांच्या पत्नी या नगरसदस्य म्हणून महापालिकेत निवडून गेल्या आहेत.

साहेब, हप्ते कसे भरणार?
बऱ्याच बँकांनी नगरसदस्य किंवा त्यांच्या पतीराजांना कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, साहेब आमच्या बँकेतून कर्ज घेतल्यावर त्याचे हप्ते कसे फेडणार, असा सवाल अधिकारी या माननीयांना विचारू लागले आहेत. कारण या माननीयांचे उत्पन्न आणि त्यांना हवे असलेले कर्जाचे हप्ते यात बरीच तफावत असल्याने हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्वांमुळे ‘नाकापेक्षा मोती जड’ म्हणण्याची वेळ या माननीयांवर आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज