अ‍ॅपशहर

रिडींग एजन्सीचे कंत्राट केले रद्द

‘महावितरण’च्या सेंट मेरी उपविभागांतर्गत पावणेआठ हजार वीजग्राहकांना शून्य युनिटचे वीजबिल देऊन पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या ‘जी नेक्स्ट टेक सोल्यूशन’ या मीटर रिडींग एजन्सीच्या कामाचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. तसेच, कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी उत्तर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.

Maharashtra Times 14 Dec 2017, 4:18 am
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम electricity meter reading agencies contract banned
रिडींग एजन्सीचे कंत्राट केले रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महावितरण’च्या सेंट मेरी उपविभागांतर्गत पावणेआठ हजार वीजग्राहकांना शून्य युनिटचे वीजबिल देऊन पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या ‘जी नेक्स्ट टेक सोल्यूशन’ या मीटर रिडींग एजन्सीच्या कामाचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. तसेच, कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी उत्तर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.
खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न मांडला होता. ‘महावितरण’च्या रास्तापेठ विभागांतर्गत लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखे विहार रोड परिसरातील वीजग्राहकांच्या मीटरचे रिडींग घेण्याचे काम भोसरी येथील ‘जी नेक्स्ट टेक सोल्यूशन’ या एजन्सीला देण्यात आले होते. एजन्सीने ऑगस्टच्या बिलासाठी मीटर रिडींग घेताना चुका केल्याने लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखेविहार रोड, समता कॉलनी, कुबेरा पार्क, सिंध हिंद कॉलनी, केदारी नगर, इथोपिया सोसायटी, गंगा सॅटॅलाइट सोसायटी, ग्रीन व्हॅली आदी परिसरातील सात हजार ७०९ ग्राहकांना शून्य युनिटचे वीजबिल दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे महावितरणचा एक कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल बुडाला होता. तसेच एजन्सीने महावितरणकडे जमा केलेला बँक हमी दस्त चोरी करून त्याऐवजी दुसऱ्या बँकेचा बनावट दस्त जमा केल्याची गंभीर बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी एजन्सीवर काय कार्यवाही केली अशी विचारणा तापकीर यांनी केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज