अ‍ॅपशहर

माजी नगरसेवक सतीश लोंढे यांचे ​निधन

काँग्रेसचे माजी नगरसेवक सतीश लोंढे (वय ५८) यांचे हृदयविकाराने बुधवारी रात्री साडेबारा वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Maharashtra Times 10 Nov 2017, 4:49 am
म. टा. प्रतिनिधी,हडपसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ex corporator satish londhe is no more
माजी नगरसेवक सतीश लोंढे यांचे ​निधन


काँग्रेसचे माजी नगरसेवक सतीश लोंढे (वय ५८) यांचे हृदयविकाराने बुधवारी रात्री साडेबारा वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
वानवडी येथील स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम,काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे,पालिकेचे विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक अशोक कांबळे, प्रमोद भानगिरे, वसंत मोरे, साईनाथ बाबर आदी उपस्थित होते.
लोंढे रामटेकडी प्रभागातून १९९७ ते २०१७ पर्यंत चारवेळा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडणून आले होते. लोंढे यांच्यामुळे रामटेकडी प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पाच वर्षांपूर्वी मुलीच्या निधनानंतर त्यांनी तिच्या नावाने स्व.सुषमा सतीश लोंढे सामाजिक संस्था स्थापन करून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली होती. बुधवारी नोटाबंदीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनात एस. पी. कॉलेज ते वसंतदादा पाटील पुतळ्यापर्यंतच्या रॅलीत ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज